Type Here to Get Search Results !

संत एकनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

संत एकनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा सिल्लोड सिल्लोड येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित संत एकनाथ विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत एकनाथ प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दिनेश गोंगे यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुण्या म्हणुन संत एकनाथ माध्यमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमलता बोरोले यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिनेश गोंगे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिनेश गोंगे यांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली.या वेळी विद्यार्थीनी स्वराली परदेशी,वैष्णवी जैस्वाल,मयुरी शिंदे,भाग्यश्री लहाने आदींनी प्रजासत्ताक दिनाची महती भाषणाद्वारे स्पष्ट केली तर विद्यार्थिनी ज्ञानंदा पोफळे, नंदिनी पोफळे,दिपाली जाधव,आदीनी भारत कि बेटी या गाण्यावर नृत्य करून उपस्तित पालकांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये गणेश साळवे,आदेश सुरडकर,रमेश सपकाळ,गणेश गरुड,सचिन गव्हाणे,सचिन पालोदकर,रितेश दळवी,साळूबा सुलताने,सागर वायकुळे,विनोद तांगडे,सुवर्णा फालक,सीमा कासार, अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर,भारती नाईक,गीता जाधव,शारदा ठोंबरे,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राणी अमृते व अक्षरा तायडे यांनी केले तर आभार सहशिक्षक श्री.गणेश साळवे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

#codes

Hollywood Movies